सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय याची माहिती आपण घेतली. आता आपण सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी काय करता येईल त्याची माहिती घेऊया. सेरेब्रल पाल्सी हा असा विकार आहे ज्यात स्नायूंच्या शक्तीवर आणि समन्वयावर नियंत्रण आल्याने रुग्णाच्या हालचालींवर मर्यादा येतात...
सेरेब्रल पाल्सीचे उपचार : अनेक सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांच्यात सर्वसाधारण / High बुद्धिमत्ता असू शकते . जर ह्या मुलांना थोडा आधार मिळाला तर “सामान्य “ मुलांप्रमाणे शैक्षणिक पातळीवर ही मुले चांगल करू शकतात . परंतु काही सेरेब्रल पाल्सी च्या मुलांना शैक्षणिक अडथळे सोसावे लागतात . काहीना वाचादोष तर काहींची जड जिभ असल्याकारणाने अस्पष्ट वाचा असते , काही मुले इतरांशी योग्य संभाषण साधू शकत नाही अशा मुलांना आधाराची गरज असते . दोन सेरेब्रल पाल्सी ची मुले एकसारखी नसतात . ह्या कारणाने शिक्षकांनसाठी अशा मुलांना हाताळणे आव्हानात्मक आहे . शिक्षकांना पूर्ण शारीरिक परीक्षण व वैकासिक क्षेत्रातील विकासाची समाज असणे आवश्यक आहे . वाचा (संभाषण , भाषा )संवेदिक क्षमता , ज्ञान (आकलन शक्ती ) विकास , सामाजिक /मानसिक विकास , दैनदिन कार्यक्षमता ह्या सर्वांची माहिती असणे आवश्यक आहे .
वरील सर्व बाबींना लक्षात घेऊन अशा मुलांना सर्वसाधारण मुलांबरोबर शिकवणे साधारण शिक्षकांना अवघड वाटत असेल . सेरेब्रल पाल्सी असलेली मुल सर्वसाधारण शाळेत जाताना अनेक अडथळे समोर येतात . चलनवलन यंत्रणा बाधित असल्याकारणाने मजले ओलांडताना , जिन्याने वर खाली जाताना , स्वच्छतागृहाचा वापर करणे , इ . अशा गोष्टी करताना दमछाक होते . इमारतीच्या घडणावलीत फरक केल्याने ह्या मुलांना वरील क्रिया काही प्रमाणात सोप्या होऊन त्यांची क्षमता सुधारू शकते . उदा . लिफ्टची सोय असणे , विशेष शौचालय व त्यामध्ये मोठी दार असणे , संडासाजवळ धरायला बार असणे , Ramp असणे इ .शरीराच्य ज्या भागावर परिणाम झाला आहे त्यानुसार सेरेब्रल पाल्सीचे वर्गीकरण करता येईल .
1. मोनोप्लेजिया (Monoplegia) - एक हात किवा पायावर परिणाम झाला आहे .
2. हेमीप्लेजिया (Hemiplegia) - शरीराच्या एका भागावर परिणाम झाला आहे .
3. डायप्लेजिया (Diaplegia) – हातांपेक्षा पायावर अधिक परिणाम झालेला आहे .
4. पैराप्लेजिया (Paraplegia) - दोन्ही पायावर परिणाम झालेला आहे .
5. क्वाड्रीप्लेजिया (Quadriplegia) – संपूर्ण शरीरावर परिणाम झालेला आहे .
मेदुच्या कोणत्या भागाला इजा झाली आहे त्यावरून सेरेब्रल पाल्सीचे प्रकार ओळखले जातात .
1. स्पासटीसिटी (Spasticity) – शरीराच्या ज्या भागात स्पासटीसिटीने व्यापले आहे तो भाग तंग, घट्ट व कडक जाणवतो. अवयव हलवून बघताना हालचालीला विरोध जाणवतो. हा तंगपणा चलनवलनात अडथळा निर्माण करतो ओ दीर्घकाळ हस्तक्षेप न करता सोडल्यास कायमस्वरूपी साध्यात विकृती निर्माण होऊ शकते . स्नायू कडक होताना शरीर मागच्या बाजूने धनुष्यासारखे ताणते, पायाचे स्नायू ताठरतात व हात कोपऱ्यापासून वाकत खाद्यापासून शरीराच्याजवळ जाते .स्नायुतील ताठरपणा अतीव आनंद , भीती किवां चिंतने वाढते.
2. एथेटोसिस (Athetosis) – अनैच्छिक, हेतुविरहित व अनियंत्रित हालचाली होय . मुलाने चलनवलनाचे प्रयत्न केले की वरील हालचाली दिसू लागतात व सर्वसाधारण हालचालींना अडथळा निर्माण करतात . अश्या हालचाली व्यक्ती उत्तेजित झाल्यास , घाबरल्यास अथवा क्रिया करण्याचा विचार ही केल्यास दिसू लागतात . मुल थकलेले असेल तर त्या क्रिया मंदावतात किवां झोपलेले असेल तर दिसत नाही . एथेटोसिस च्या क्रिया सर्व शरीरात होतात . काही वेळा ह्यांच्या जोडीला स्पासटीसिटी ही असू शकते.
3. एटेक्सिया (Atexia)- ह्या व्यक्तींना क्रिया (चलनवलन) करताना शरीर संतुलन सांभाळणे अवघड जाते . डोक , धड , खांदा व कंबर – ओटीपोटाच्या भागात स्थैर्य नसते . ऐच्छिक हालचाली असून ती तुटक व असुत्रित असतात .स्वतः पासून अंतर ओळखणे अवघड असते . ह्या सोबत हातात थरथर असण्याची शक्यता असते . मुल उभं राहताना पायांमध्ये अंतर ठेऊन उठतो व स्वत:च्या सांभाळासाठी हाताचा वापर करतो .
अधिक माहिती साठी खालील Video पहा . सेरेब्रल पाल्सी व त्यावरील उपचार
Comments