top of page

स्किल पार्क सेलू येथे वृक्षारोपण _(किड्स फाउंडेशन व नगरपंचायत सेलू यांचा संयुक्त उपक्रम)_

सेलू:- किड्स फाउंडेशन व नगरपंचायत सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने स्कील पार्क सेलू येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी विविध प्रकारच्या रोपटे लावण्यात आले असून वृक्षसंवर्धनासाठी पाणी देण्याची पुढील सोय करण्यात आली.तसेच उन्हाळ्यामध्ये रोपटे जगावे या करिता प्लास्टिक बॉटलच्या मदतीने ठिबक सिंचन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

वृक्षारोपण कार्यक्रम सोबतच सदर परिसर स्वच्छ करण्यात आला. आगामी काळात स्किल पार्कमध्ये विद्यार्थ्यांन करीता विविध उपक्रम घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.कार्यक्रमाला नगरपंचायत मधील कार्यालय अधीक्षक रघुनाथ मोहिते, प्रशांत रहांगडाले, हेमंत नाईकवाडे व सर्व कर्मचारी तसेच किड्स फाउंडेशनचे डॉ. गिरीश वैद्य, स्वप्नील वैरागडे, शरद ढगे, मिनल गिरडकर, प्राजक्ता मुते, उल्हास राठोड, पवन बानोकर, सोनटक्के आदी सदस्य उपस्थित होते.


✍🏻 *किड्स फाउंडेशन, वर्धा*

www.kidsfoundation.in

6 views0 comments

Comments


bottom of page