top of page

टोपीचा मित्र

पाच वर्षाचा अमेय सकाळी सकाळी खुप खुश होता. आज त्याची आई, ऋचा त्याला केस कापायला स्कुटीवर समोर बसून घेऊन जाणार होती. सकाळचा नाश्ता उरकून, अमेय ची हाताची गाडी, या रूममधून त्या रूममध्ये सुरु होती. कितीतरी दिवसापासून तो घराच्या बाहेर गेला नव्हता. कोरोना बाहेर खूप बदमाशी करत आहे आणि त्यामुळे आपल्याला घरात राहावे लागत आहे असेच त्याला वाटत होते.

त्याच्या हाताची गाडी हळूच आजोबांच्या रूममध्ये वळली. आजोबा पेपर वाचत बसले होते. आजोबा जवळ पोहचताच अमेय नी सांगितलं कि तो आज आईसोबत स्कुटीवर बसून केस कापायला जाणार आहे. आजोबा पेपर वाचण्यात खुप गुंग होते, तरीही त्यांनी ऐकले तो जे म्हणत होता ते.

अमेयची गाडी रूममध्ये फिरून बाहेर जायला निघाली, तेव्हा आजोबांनी त्याला थांबायला सांगितले. त्यांनी अलमारी तील एक पांढऱ्या रंगाची टोपी अमेयला दिली आणि सांगितले की, बाहेर जातांना ती टोपी घालून जा म्हणजे ऊन लागणार नाही. ती टोपी अमेयला खूप आवडली. त्यांनी लगेच ती टोपी डोक्यावर घातली आणि आरशामध्ये जाऊन पाहिले. आरशासमोर तो कितीतरी वेळ उभा असेल.त्याचा नवीन लुक त्याला खूप आवडला होता. टोपी तू इतके दिवस कुठे होती. तू माझ्या जवळ आधी का नाही आली...अशे कितीतरी प्रश्न तो टोपीला विचारात होता.अमेय च्या लहानश्या हाताचा स्पर्श टोपीला सुखावत होता. तिला कोणीतरी आपले मिळाले होते...तिच्याशी बोलणारे , स्वतःच्या मनातले सांगणारे, तिच्या अस्तित्वावर आनंदी होणारे. अमेयच्या डोक्यावर बसून ती खुप आनंदी होती. त्याचा नवीन लुक तिलाही आवडला होता.


ऋचा नी, म्हणजेच अमेय च्या आईने स्कुटीची स्टार्ट बटन दाबली, तसा लागलीच अमेय समोर येऊन उभा राहिला. आणि स्वारी निघाली कटिंग च्या दुकानाच्या दिशेनी. दुकानात पोहचल्यावर ऋचा नी अमेयची टोपी काढून हातात घेतली. अमेय खुर्चीवर बसला. समोर इतका मोठा आरसा होता, आणि मागे सुद्धा. कटिंग वाल्या काकांनी कैची, कंगवा सॅनिटायझ केले. अमेयच्या डोक्यावर हळूहळू पाण्याचा स्प्रे केला. अमेयला ते खूप आवडले होते. टोपी अगदी शांत पणे आईच्या हाताच्या गाडीमध्ये बसली होती. ती अमेयचे निरीक्षण करीत होती. अमेयचे केस हळूहळू छोटे होत होते, आणि थोड्याच वेळात तिच्या समोर एक वेगळा अमेय होता, ज्याचे केस आता अगदी छोटे छोटे होते. अमेयच्या अंगावरचे एप्रन काढून कटिंग वाल्या काकांनी त्याला ब्रश नी आणखी साफ केले, जेणेकरून त्याच्या अंगावरचे सगळे लहान लहान केस निघून जाईल. अमेय आता घरी जाण्यासाठी तयार होता आणि टोपी त्याच्या डोक्यावर बसण्यासाठी.

अमेय, आता दुकानातल्या गोष्टी पाहण्यात खूप गुंतला होता. ऋचा नी तिच्या हातातील पर्स मधील पैसे काढून कटिंग वाल्या काकांना दिले. तिनी अमेयचा हात पकडला आणि त्याला सलून मधून बाहेर आणले. अमेय नेहमी प्रमाणे आईला त्यांनी पाहिलेल्या गोष्टी बद्दल प्रश्न विचारात होता. आणि ऋचा ही, त्याच्या प्रश्नांचे उत्तर देत होती. टोपी सुद्धा त्यांचा संवाद लक्ष देऊन ऐकत होती. टोपी आता शॉपिंग सेंटर च्या पायरीवर होती. ऋचाच्या हातातून ती कधी खाली पडली हे तिलाही समजलं नाही. तिला आता अमेय चा आणि ऋचा चा आवाज खुप कमी येत होता. ती बोलायचा प्रयत्न करीत होती, पण तिला आवाजाच नव्हता.

पांढरीशुभ्र टोपी धूळ भरल्या पायऱ्यांवर पडली होती. अमेयचा आणि ऋचा चा आवाज कुठेच नव्हता. आता तिला फक्त रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. ती आता खुप घाबरली होती. अमेयच्या सुरक्षित स्पर्शाला शोधत होती. पण तो कुठेच नव्हता. तिच्या आजूबाजूने लोकांचे पाय वर

खाली जात होते. कोणाचातरी पाय तर तिच्या अंगावर पडणार होता. "अरे ..कुणाची तरी टोपी पडली वाटते", असे शब्द तिच्या कानावर येत होते. ती सारखा अमेयचा विचार करीत होती. त्याच घर, ऋचा, आजी आजोबा सगळे तिला आठवत होते.


अमेय आणि ऋचा गाडी जवळ पोहचले. अमेयला आता पुन्हा स्कुटीवर बसायचे होते. त्याला त्याची टोपी हवी होती. पण ती तर आईच्या हातात पण नव्हती. अमेयचा चेहरा आता रडलेला झाला होता. ऋचा नी त्याला हिंमत दिली, "अरे आपण शोधू तिला, सापडेलच". तिनी कटींग वाल्या काकांना विचारले, पण टोपी सलून मध्ये नव्हती. ऋचा आणि अमेय परत आलेल्या रस्त्यानी निघाले टोपीला शोधायला. ऋचा ला अपराध्यासारखे वाटत होते...तिलाही कळले नाही टोपी तिच्या हातून कधी पडली. अमेय तिला भिरभिर शोधात होता. त्यांनी शॉपिंग सेंटर च्या पायऱ्या चढायला सुरवात केली,,,आणि अमेय अगदी ओरडलाच..."माझी टोपी माझी टोपी". तिला त्यांनी उचलले, तिच्या अंगावरची सगळी धूळ साफ केली. तिला एक पप्पी दिली... आणि खुप प्रेमानी तिला आपल्या डोक्यावर घातले.

टोपीला तिचा मित्र मिळाला होता...तिच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. स्कुटी चा वेग...अमेयची सोबत... स्कुटी चालवत असतांना अमेय नी म्हटलेले गाणे..सगळे काही अप्रतिम होते.

28 views0 comments

Comentarios


bottom of page