top of page
Writer's pictureLeena Kakde, India

अशी शिकावी संस्कृत भाषा - २

विद्यार्थी मित्रांनो मागील भागात धातू म्हणजे क्रियापद .या क्रियापदांचा अभ्यास संस्कृत भाषेत लकार प्रत्ययांनी कसा केला जातो , या अभ्यासाला आपण सुरूवात केलीय . सुरूवातीला लट् ( वर्तमानकाळ ) , लङ् ( भूतकाळ ), लोट् ( आज्ञार्थ ), विधिलिङ् ( विध्यर्थ ), या पुढील लकार प्रत्ययांचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याला असायला हवा. पुर्वी बघितल्याप्रमाणे संस्कृत भाषेतील ही क्रियापद प्रत्यय , परस्मैपद - आत्मनेपद - उभयपद या स्वरुपात एकवचन , द्विवचन , बहूवचन आणि प्रथमपुरुष ,मध्यमपुरुष,उत्तमपुरुष अशा पुरुष वचनात चालतात.


कोणत्याही लकाराचे क्रियापद रुप तयार होताना, विशिष्ट गण विकरणाची देखील गरज असते. पहिल्या गणाच्या धातुंपासून दहाव्या गणाच्या धातुंचे क्रमाने विकरण देखील वेगवेगळी असतात. ती पुढील सूत्र रुपाने तयार केली जातात.

संस्कृत- शब्द - धातु- रुपावलिः , या कोष्टकरुपी पुस्तकात पृष्ठ क्रमांक ६२ यावर तुम्हाला ही प्रत्यय बघता येईल.

पुढील कोष्टक बघा.

वरील चित्रफीतमध्ये लट् लकार पुरुष, वचनात कसा चालतो हे समजत. सर्व भाषेत क्रियापद ही काळानुरुप चालतात.जसे वर्तमानकाळ , भूतकाळ, भविष्यकाळ. इतर काळातील क्रियापदांचा अभ्यास संवाद पध्दतीने बघुया.

लङ् लकारः l

राघवः - गोविन्दः ह्यः भवान् कुत्र *आसीत्* ?

गोविन्दः - अहं मित्रस्य गृहं *आसम्* l

राघवः - तत्र कः विशेषः *आसीत्* ?

गोविन्दः - आम् ! मित्रस्य जन्मदिनम् *आसीत्* l

राघवः - आम् l तत्र मोहनः रुपेशः अनन्तः इत्याद्यः *आसन्* वा ?

गोविन्दः - आम् , सर्वे अपि *आसन्* l

राघवः - भवतः गृहतः के के तत्र गतवन्तः ?

गोविन्दः - वयं सर्वे अपि गतवन्तः *आस्म* l

राघवः - साधु ! साधु !

( अनुवाद - राघव आणि गोविन्द संभाषण - गोविन्द आपण काल कुठे होता? मी मित्राच्या घरी होतो. तेथे काही विशेष होते? होय, माझ्या मित्राचा वाढदिवस होता. हो का ,तेथे मोहन,रुपेश,अनंत हे देखील होते.हो सर्वजण होते. तुझ्या घरातील कोण कोण तेथे गेले होते.आम्ही सर्वच गेलो होतो. छान,छान. )

लोट् लकारः l

हरिः ओम्, सुप्रभातम् !

नमस्ते महोदय ! स्वागतम् , *आगच्छतु*, *उपविशतु* l

धन्यवादः l

सर्वं कुशलं वा ?

आम्, कुशलम् l भवान् एतत् कथापुस्तकं *स्वीकरोतु* l

एतत् पुस्तकं, समीचीनम् अस्ति l भवान् अपि *पठतु* l

*अस्तु* , अनन्तरं पठामि l

अहं गच्छामि l

*तिष्ठतु* , पानीयं *स्वीकरोतु* l

*क्षम्यताम्* *मास्तु* l

किञ्चित् *स्वीकरोतु* l

*अस्तु*, धन्यवादः l

शर्करा अधिका अस्ति किल l

चिन्ता *मास्तु* l ( पिबति ) अहं आगच्छामि , नमस्कारः l

( दोन मित्रांचा संवाद - १) हॕलो शुभसकाळ,२ )नमस्कार , स्वागत आहे ,यावे ,बसावेत,१ ) धन्यवाद .२ )सर्व ठीक आहे ना ? १ ) होय ,सर्व ठीक आहे .आपण हे गोष्टींचे पुस्तक घ्यावेत. हे पुस्तक छान आहेत.आपणही वाचावेत.२) ठीक आहे नंतर वाचतो.१) मी जातो. २) थांबा, सरबत घ्या.क्षमा असावी. नको.१) थोडेच घ्या.२) ठीक आहे.धन्यवाद १)खरोखर,साखर अधिक आहे का,२) काळजी नसावी. (पितो) मी येतोय .नमस्कार .)

वैद्यः - किम् अभवत् ?

रोगी - ज्वरः महोदय !

वैद्यः - कदा आरम्भ ?

रोगी - ह्यः आरभ्य l शिरोवेदना अपि *अस्ति* l

वैद्यः - आहारः *रोचते* वा ?

रोगी - आम् , रोचते l

वैद्यः - जिह्वां *प्रदर्शयतु* l *भवतु* ,एतत् औषधम् एताः गुलिकाः च *स्वीकरोतु* l

रोगी - अद्य मया स्नानं कर्तुं *शक्यते* किल ?

वैद्यः - *शक्यते* , किन्तु उष्णजलेन *करोतु* l शीतजलेन मास्तु l यतः भवतः ज्वरः प्रायशः शीतकारणतः एव आगतः *स्यात्* l

रोगी - महोदय ! अहं स्वस्थः *भवेयम्*? वा ?

वैद्यः - एतत् औषधं *स्वीकरोतु* , निश्चयेन स्वस्थः *भवेत्* भवान् l

रोगी - धन्यवादः l

(अनुवाद - वै.)काय झाले ? रो.) ताप आहे.वै)केव्हा पासून ?रो.)कालपासून डोके सुध्दा दुखतयं.वै ) जेवण आवडत ( होते आहे )आहे ? रो ) होय,आवडते.वै ) जिभ दाखवा.असुद्या,हे औषध या गोळ्या घ्या. इनजेक्शन घेणे आवश्यक आहे का ? वै ) नाही इतके पुष्कळ आहे.रो ) आज मी आंघोळ करु शकतो?वै ) हो ,परंतु गरम पाण्याने करावी .थंड पाण्याने नको. कारण आपला ताप पुर्वीच थंडी मुळे आला आहे .रो) वैद्यमहोदय मी उद्या स्वस्थ होईल ना ? वै ) हे औषध घ्या,आपण निश्चित स्वस्थ व्हाल. रो ) धन्यवाद.)

याप्रमाणे संस्कृत भाषेतील काही लकारांचा, म्हणजेच क्रियापदांचा अभ्यास आपण बघितला. अधिकाधिक धातुंना अर्थपूर्ण लक्षात ठेवण्यासाठी त्यावरील रञ्जक क्रीडा खेळून सुध्दा त्यांचे दृढीकरण यथायोग्य करता येते, ज्यामुळे क्लिष्ट वाटणारी प्रत्यय तालिका क्षणात ग्रहण करता येते.




68 views0 comments

Commenti


bottom of page